बातम्या
भुदरगड तालुक्यातील लोकांना लाभ देण्याची मागणी...
By nisha patil - 4/8/2025 4:47:25 PM
Share This News:
भुदरगड तालुक्यातील लोकांना लाभ देण्याची मागणी...
काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. योजनेत पारदर्शकतेची केली मागणी
तारा न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश खतकर कोल्हापूर भुदरगड तालुक्यातील वाड्या-वस्त्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या गरजू नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामागे तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई यांचे मार्गदर्शन होते.
भुदरगड तालुका हा डोंगराळ भागात असून अनेक वाड्या-वस्त्या दुर्गम ठिकाणी आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक पारदर्शकता आणि योग्य अंमलबजावणी गरजेची आहे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या वेळी लाभार्थींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भुदरगड तालुका काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले,"शासनाच्या विविध योजना कागदावरच न राहता प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अनेक लोक आधार नसल्यामुळे वंचित राहतात. म्हणूनच आम्ही ही मागणी प्रशासनापर्यंत पोहोचवली आहे. जर कारवाई झाली नाही, तर पुढील काळात आंदोलनात्मक पावले उचलली जातील."
भुदरगड तालुक्यातील लोकांना लाभ देण्याची मागणी...
|