विशेष बातम्या

कोल्हापूर शहरातील विद्रूपीकरण थांबवण्याची मागणी; 

Demand to stop the disfigurement in Kolhapur city


By nisha patil - 8/19/2025 6:04:43 PM
Share This News:



कोल्हापूर शहरातील विद्रूपीकरण थांबवण्याची मागणी; 

माजी महापौरांचा महापालिका व MSEB अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच सुरू झाल्याने आणि श्री क्षेत्र अंबाबाई मंदिर तसेच पर्यटनामुळे कोल्हापूर शहराचे आर्थिक उत्पन्न वाढत असताना, शहराचे सौंदर्य मात्र बाधित होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिका व MSEB अधिकाऱ्यांच्या निष्काळजी कारभारावर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.

पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यात MSEB कडून रस्त्यावरील वृक्षांच्या फांद्या छाटल्या जातात. मात्र या फांद्या व पालापाचोळा रस्त्यावरच टाकून दिला जातो. महापालिका व MSEB यांनी समन्वय साधून त्वरित डंपरद्वारे तो कचरा उचलण्याची व्यवस्था केली पाहिजे होती. परंतु तसे न झाल्यामुळे तो आठ-दहा दिवस रस्त्यावर पडून राहतो आणि शहर विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरतो, अशी नाराजी आजरेकर यांनी व्यक्त केली आहे.

तसेच नागरिकांची जबाबदारी अधोरेखित करताना त्यांनी आवाहन केले की, कोल्हापूरकरांनी रस्त्यावर उघड्यावर कचरा, प्लास्टिक वा खराब साहित्य टाकू नये आणि महापालिकेच्या सोयींचा योग्य वापर करून शहर स्वच्छ व सुंदर ठेवावे.


कोल्हापूर शहरातील विद्रूपीकरण थांबवण्याची मागणी; 
Total Views: 43