आरोग्य
कोल्हापुरात डेंग्यूचा धोका वाढतोय! 36 घरांमध्ये आढळले डासांच्या आळ्या
By nisha patil - 2/7/2025 5:05:59 PM
Share This News:
कोल्हापुरात डेंग्यूचा धोका वाढतोय! 36 घरांमध्ये आढळले डासांच्या आळ्या
कोल्हापूर शहरात डेंग्यू आणि काविळीसारख्या आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने मंगळवारी शहरातील विविध भागात जोरदार सर्वेक्षण राबवले. आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून तब्बल 3,711 घरांची तपासणी करण्यात आली.
यात चिंताजनक बाब म्हणजे, 36 घरांमध्ये डेंग्यू डासांच्या आळ्या आढळल्या आहेत, तर 13 नागरिक तापाने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.
डासांची पैदास रोखण्यासाठी 4,361 घरांतील कंटेनर तपासण्यात आले, यातील 28 कंटेनर रिकामे करण्यात आले असून 8 कंटेनरमध्ये औषध फवारणीही करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने 15,343 नागरिकांची आरोग्य तपासणी केली असून 7 जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
शहरात जलजन्य आणि कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सात रूप नियंत्रण विभागामार्फत विशेष मोहिम राबवली जात आहे.
नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधक माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले असून स्वच्छतेसाठी ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ताप आल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेने केलं आहे.
कोल्हापुरात डेंग्यूचा धोका वाढतोय! 36 घरांमध्ये आढळले डासांच्या आळ्या
|