बातम्या

कोल्हापुरात हद्दपार आरोपीचा शहरात प्रवेश; शाहुपूरी पोलिसांकडून अटक

Deported accused enters Kolhapur city


By Administrator - 11/1/2026 12:00:03 PM
Share This News:



कोल्हापूर :- कोल्हापूर शहरात टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने खुनाचा प्रयत्न, गंभीर व साधी दुखापत, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान, गर्दी मारामारी, शिवीगाळ, धमकी देणे, हत्यार कायद्याचा भंग तसेच सरकारी नोकरावर हल्ला यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा पूर्व इतिहास असलेल्या सदर बाजार येथील गब्बर गँग टोळीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55 अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

याप्रकरणी गब्बर गँग टोळीचा प्रमुख व सदस्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी दिले होते.

दरम्यान, या टोळीतील सदस्य रोहन उर्फ टिल्या सुहास होळकर (वय 24, रा. कोरगांवकर हायस्कूल समोर, सदर बाजार, कोल्हापूर) हा हद्दपारीचा आदेश असतानाही कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत संशयास्पदरीत्या सदर बाजार परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मा. पोलीस निरीक्षक श्री. संतोष डोके यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार श्री. डोके यांनी तत्काळ त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना कारवाईचे आदेश दिले. शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर बाजार परिसरात शोध घेतला असता, संबंधित आरोपी तोंडाला रुमाल बांधून फिरताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

नंतर आरोपीला अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची सब-जेल, बिंदू चौक येथे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक 15437 बांगर हे करीत आहेत.


कोल्हापुरात हद्दपार आरोपीचा शहरात प्रवेश; शाहुपूरी पोलिसांकडून अटक
Total Views: 27