बातम्या

उपमुख्यमंत्री अजितदादांचे करवीर नगरीत भव्य स्वागत

Deputy Chief Minister Ajitdada receives grand welcome in Karveer Nagar


By nisha patil - 5/23/2025 4:18:51 PM
Share This News:



उपमुख्यमंत्री अजितदादांचे करवीर नगरीत भव्य स्वागत

ए.वाय. पाटील, हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वागत सोहळा संपन्न

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचे करवीर नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याचे आयोजन ज्येष्ठ नेते ए.वाय. पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, बाबासाहेब आसुर्लेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. करवीर नगरीतील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी अजितदादांचे जल्लोषात स्वागत करत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.

कार्यक्रमात अजित पवार यांनी करवीर तालुक्याच्या विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहण्याचा पुनरुच्चार केला. उपस्थित नेत्यांनीही त्यांच्या पुढाकाराचे आणि नेतृत्वाचे कौतुक करत एकसंघपणे जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


उपमुख्यमंत्री अजितदादांचे करवीर नगरीत भव्य स्वागत
Total Views: 120