विशेष बातम्या
कोल्हापूर नगरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीयांचे स्वागत
By nisha patil - 12/5/2025 2:24:10 PM
Share This News:
कोल्हापूर नगरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीयांचे स्वागत
कोल्हापूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजीराव शिंदे साहेब आणि बंधू प्रकाश संभाजीराव शिंदे साहेब यांचे कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. हे स्वागत कोल्हापूरचे आमदार आणि गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याच कार्यक्रमात मा. प्रकाश शिंदे साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणजी डोंगळे आणि डोंगळे वहिनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी राज्याचे आरोग्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब, आमदार मा. जयश्री जाधव, गोकुळ दूध संघाचे संचालक अजित नरके, नंदकुमार ढेंगे, करणसिंग गायकवाड, मुरलीधर जाधव, के. डी. सी. बँकेचे संचालक ए. वाय. पाटील आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर नगरीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीयांचे स्वागत
|