बातम्या
महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात साधू-संत व लोकप्रतिनिधींची सविस्तर चर्चा
By nisha patil - 5/8/2025 3:18:30 PM
Share This News:
महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात साधू-संत व लोकप्रतिनिधींची सविस्तर चर्चा
महादेवी हत्तीणी संदर्भात मुख्यमंत्री बैठकीपूर्वी निर्णायक हालचाली
नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला मठात परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नांदणी मठाचे मठाधिपती जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज, कोल्हापूर मठाचे मठाधिपती लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज, वरुर मठाचे मठाधिपती धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज आणि तिजारा मठाचे मठाधिपती सौरभसेन भट्टारक पट्टाचार्य महाराज यांनी सहभाग घेतला.
या साधू-संतांच्या उपस्थितीत माजी मंत्री व आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) तसेच माजी आमदार प्रकाश आवाडे यांनीही उपस्थित राहून महादेवी हत्तीणीच्या परतवण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. चर्चेत कायदेशीर अडचणी, पर्यावरणविषयक नियम तसेच जनभावना यांचा समतोल राखून मार्ग काढण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील पुढील बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी उपमुख्यमंत्री कार्यालयात साधू-संत व लोकप्रतिनिधींची सविस्तर चर्चा
|