बातम्या

आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील समस्यांवर सविस्तर बैठक...

Detailed meeting on city issues in the presence of MLA Satej Patil


By nisha patil - 11/19/2025 3:53:36 PM
Share This News:



आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील समस्यांवर सविस्तर बैठक...

समस्या प्रभावीपणे सोडवण्यासाठी दिल्या सूचना...

कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाबरोबर शहरातील महत्वाच्या विषयांवर विविध शिष्टमंडळ आणि समाजाचे प्रतिनिधींनी बैठक पार पडली. या बैठकीला आमदार जयंत आसगावकर तसेच महापालिकेच्या आयुक्त व प्रशासक के. मजुलक्ष्मी उपस्थित होत्या.

बैठकीत फेरीवाले संघटना, दुकानदार, गाळाधारकांचे प्रश्न, वारसाहक्क नियुक्ती, पाणीपुरवठा, रस्ते व नागरी सुविधा, आरोग्य व स्वच्छता, तसेच विविध समाज व सामाजिक संस्थांचे प्रश्न मांडले गेले. प्रशासनासमोर सर्व समस्यांचे प्रभावीपणे मांडणी करून त्वरित सोडवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, फेरीवाले व दुकानदार संघटनांचे शिष्टमंडळ, समाजाचे प्रतिनिधी, महापालिकेतील अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. ही चर्चा मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025, निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क येथे सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.


आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील समस्यांवर सविस्तर बैठक...
Total Views: 34