बातम्या
कोल्हापुरात पंचगंगेवर 51 हजार दिव्यांनी उजळली ‘देवदिवाळी’!
By nisha patil - 5/11/2025 4:12:48 PM
Share This News:
कोल्हापुरात पंचगंगेवर 51 हजार दिव्यांनी उजळली ‘देवदिवाळी’!
कोल्हापुरात मंगळवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा थाट पाहायला मिळाला.कोल्हापूरकरांनी तब्बल 51 हजार दिव्यांनी घाट उजळून टाकला.
फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावटीने संपूर्ण घाट दैवी तेजाने झळाळून गेला.
भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय मिळवला, त्याच स्मरणार्थ हा ‘देवदिवाळी’चा दीपोत्सव साजरा केला जातो.
पहाटेपासूनच हजारो नागरिकांनी पंचगंगेवर गर्दी करून या दैवी सोहळ्याचं दर्शन घेतलं.
कोल्हापुरात पंचगंगेवर 51 हजार दिव्यांनी उजळली ‘देवदिवाळी’!
|