राजकीय
कोल्हापूरात विकासाला वेग — प्रभाग २७ मधील रस्ते कामाचा शुभारंभ
By nisha patil - 2/12/2025 12:25:46 PM
Share This News:
कोल्हापूर:- कोल्हापूरच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या शिवसेनेतर्फे आज आणखी एका महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष निधीतून कोल्हापूर शहरातील (जुना) प्रभाग क्र. 27 अंतर्गत ‘राऊत मेडिकल ते महाराणा प्रताप चौक’ या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
मेढे तालीम परिसरात आयोजित कार्यक्रमात शहरातील रस्ते, गटारी आणि पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांचे सुदृढीकरण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. या प्रसंगी माजी नगरसेवक आदिल फरास, रमेश पोवार, संगीता पवार-मेढे, संग्राम मेढे, ताहीर मुजावर, निहाल मुजावर, अतुल चव्हाण, सचिन गोंदकर, निरंजन पोवार, सोनू पोवार, आकाश पोवार, शिवाजी घोटणे, राजू पाटील, वसीम धरवाडकर, प्रशांत हवळ, प्रमुख कार्यकर्ते हाजी इर्शान बडवळ, हाजी दस्तगीर बागवान, धरवाडकर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोल्हापूरात विकासाला वेग — प्रभाग २७ मधील रस्ते कामाचा शुभारंभ
|