ताज्या बातम्या
₹90 कोटींचा विकास निधी मंजूर; कोल्हापूरसह पाच महापालिकांना लाभ, सांगली महापालिका वंचित
By nisha patil - 12/17/2025 11:03:02 AM
Share This News:
महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, सोलापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या नागरी सोयीसुविधा व पायाभूत विकासासाठी एकूण ₹90 कोटींचा निधी मंजूर केला आहे, ज्यापैकी पहिल्या टप्प्यात ₹22.50 कोटींचे वितरण संबंधित महापालिकांना करण्यास मान्यता देण्यात आली आहे; मात्र सांगली, मिरज व कुपवाड महापालिकांना या निधीतून काहीही भाग मिळालेला नाही आणि त्यांच्या हाती अजूनपर्यंत निधीचा वाटा आलेला नाही.
राज्य शासनाने हा निधी केवळ मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी वापरावा आणि इतर कामांसाठी वळवू नये, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. वितरित निधीनुसार पिंपरी चिंचवड महापालिकेला ₹5 कोटी (यात ₹1.25 कोटी वितरीत), पुणे महापालिकेला ₹45 कोटी (₹11.25 कोटी वितरीत), सोलापूरला ₹5 कोटी (₹1.25 कोटी वितरीत), कोल्हापूरला ₹30 कोटी (₹7.50 कोटी वितरीत) आणि इचलकरंजी महापालिकेला ₹5 कोटी (₹1.25 कोटी वितरीत) अशी विभागणी करण्यात आली आहे.
₹90 कोटींचा विकास निधी मंजूर; कोल्हापूरसह पाच महापालिकांना लाभ, सांगली महापालिका वंचित
|