ताज्या बातम्या
हातकणंगले गावासाठी 30 लाखांचा विकासनिधी; आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन
By nisha patil - 5/8/2025 3:15:16 PM
Share This News:
हातकणंगले गावासाठी 30 लाखांचा विकासनिधी; आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन
सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय;
ड्रेनेज योजनेचे काम सुरूहातकणंगले गावातील तलावात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगरसेवक अभिजीत लुगडे यांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्याकडे पाठपुरावा करून 30 लाखांची निधी मंजूर करून घेतला.
या निधीतून गटार व ड्रेनेज पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पार पडले.या कामामुळे परिसरातील नागरिकांची आरोग्यविषयक मोठी गैरसोय टळणार असून समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमावेळी बायपास रस्त्याच्या मागणीसह अनेक नागरिक उपस्थित होते.
हातकणंगले गावासाठी 30 लाखांचा विकासनिधी; आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन
|