बातम्या
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ
By nisha patil - 10/11/2025 5:48:23 PM
Share This News:
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ
युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाले उद्घाटन
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून खोल खंडोबा व शिपुगडे तालीम परिसरातील विकासकामांचा शुभारंभ युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते झाला. वेल्हाळ बाग परिसरातील पॅसेज आणि गटर कॉंक्रीटीकरणासाठी २० लाख, तर शिपुगडे तालीमजवळील पॅसेजसाठी १० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
कार्यक्रमाला माजी नगरसेवक किरण शिराळे, नंदकुमार मोरे, माजी महापौर सरिता मोरे यांच्यासह विशाल शिराळे, सुरेश काळे, संतोष भोसले, पृथ्वीराज मोरे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसराच्या विकासासाठी खासदार धनंजय महाडिक कटिबद्ध असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून विकासकामांचा शुभारंभ
|