बातम्या

इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पश्चिमच्या वतीने रक्तदान शिबिर

Devendra fadanvis 5

By nisha patil - 7/22/2025 12:23:42 PM
Share This News:

इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पश्चिमच्या वतीने रक्तदान शिबिर

इचलकरंजी, ता. २२ जुलै — महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, इचलकरंजी पश्चिम यांच्या वतीने भाजपा कार्यालय, इचलकरंजी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब, माजी आमदार सुरेश हाळवणकर व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

कार्यक्रमास इचलकरंजी पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, भाजपाचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरात अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेत रक्तदान केले. भाजपाच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.

इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा पश्चिमच्या वतीने रक्तदान शिबिर
Total Views: 75