राजकीय
इचलकरंजीत भाजपा वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
By nisha patil - 7/22/2025 11:50:00 AM
Share This News:
इचलकरंजीत भाजपा वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
इचलकरंजी, ता. २२ जुलै — महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, इचलकरंजी पूर्व यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर आमदार डॉ. राहुल आवाडे जनसंपर्क कार्यालय, श्री शिवतीर्थ बस स्थानक शेजारी, इचलकरंजी येथे संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, भाजपा कोअर कमिटीचे सदस्य प्रकाश दतवाडे, तसेच भारतीय जनता पार्टीचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले. समाजसेवेचा वसा जपणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या माध्यमातून एक सकारात्मक संदेश दिला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.
इचलकरंजीत भाजपा वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
|