बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदूतांची समाजसेवा
By nisha patil - 7/24/2025 3:30:34 PM
Share This News:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदूतांची समाजसेवा
रुग्णांना खाऊ वाटप, आरोग्य योजनांचे प्रबोधन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भादोले प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक विधायक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत केंद्रात दाखल रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यात आली.
या प्रसंगी आरोग्य अधिकारी डॉ. अनिकेत खराडे यांनी उपस्थितांना महत्त्वाच्या शासकीय योजना समजावून सांगितल्या. यामध्ये 'मुख्यमंत्री आरोग्य सेवा', 'महात्मा फुले जन आरोग्य योजना' अशा लाभदायक योजना सांगून नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.
कार्यक्रमास भाजपचे जिल्हा चिटणीस नाना जाधव, रणजीत माने यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस रुग्णसेवेच्या माध्यमातून साजरा केल्याबद्दल समाधान व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्यदूतांची समाजसेवा
|