बातम्या
देवी शांतादुर्गा देवस्थान, उसपच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड...
By nisha patil - 9/7/2026 3:16:30 PM
Share This News:
देवी शांतादुर्गा देवस्थान, उसपच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड...
दोडामार्ग : गवस शुभम तालुक्यातील उसप येथील श्री देवी शांतादुर्गा देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्त मंडळाची पहिली सभा ५ जुलै २०२६ रोजी देवस्थानच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेत पुढील पाच वर्षांच्या (२०२६ ते २०३१) कार्यकालासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष श्री. प्रदिपसिंह इंद्रसेन देसाई होते. सविस्तर चर्चेनंतर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत :
अध्यक्ष – श्री. प्रदिपसिंह इंद्रसेन देसाई
उपाध्यक्ष – श्री. राजेश वासू गवस
सचिव – श्री. प्रकाश सखाराम गवस
सहसचिव – श्री. भूपेश नारायण गवस
खजिनदार – श्री. भरत अर्जुन गवस
तसेच देवस्थानच्या कायदेशीर सल्लागारपदी श्री. बळीराम विश्वनाथ नाईक यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित विश्वस्त, ग्रामस्थ आणि भक्तगणांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सभेला सर्व नवनिर्वाचित विश्वस्तांसह श्री. मोहन विष्णू गवस, धनंजय आपा गवस, डॉ. व्ही. जी. नाईक, भिकाजी गवस, शिवा बु. गवस, गंगाराम गवस, दाजी नाईक तसेच अन्य ग्रामस्थ व भक्तगण उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी देवस्थानचा कारभार अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भक्ताभिमुख पद्धतीने चालविण्याचा निर्धार व्यक्त केला. धार्मिक परंपरा जपत देवस्थानच्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
देवी शांतादुर्गा देवस्थान, उसपच्या नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड...
|