बातम्या
गणपती बाप्पांचं हे रूप पाहून भक्तही थबकले! ‘कोल्हापूरचा गोविंदा’ची अनोखी संकल्पना चर्चेत
By nisha patil - 9/23/2026 4:44:33 PM
Share This News:
गणपती बाप्पांचं हे रूप पाहून भक्तही थबकले! ‘कोल्हापूरचा गोविंदा’ची अनोखी संकल्पना चर्चेत
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भगवा ग्रुप मित्र मंडळाने यंदा अनोखी संकल्पना साकारत गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कोल्हापूरचा गोविंदा’ म्हणून ओळख असलेल्या या मंडळाची राधा-कृष्ण रूपातील आकर्षक गणेशमूर्ती सध्या भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.यंदाच्या गणेशोत्सवात काहीतरी वेगळे सादर करण्याच्या उद्देशाने मंडळाने ही संकल्पना साकारली आहे. गणेशमूर्तीतील बारकावे, चेहऱ्यावरील भाव, आकर्षक सजावट आणि कलात्मक मांडणी यामुळे मूर्तीला विशेष उठाव मिळाला आहे. मूर्तीमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.
संकल्पनेपासून मूर्तीच्या अंतिम स्वरूपापर्यंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमातून पारंपरिक भक्ती आणि आधुनिक कलात्मकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळत आहे. त्यामुळे गणेशभक्तांकडूनही या अनोख्या संकल्पनेचे कौतुक होत आहे. कोल्हापुरातील विविध गणेश मंडळांच्या आकर्षक मूर्ती आणि देखावे यंदा भाविकांचे लक्ष वेधून घेत असताना भगवा ग्रुप मित्र मंडळाची राधा-कृष्ण रूपातील गणेशमूर्ती उत्सवातील विशेष आकर्षण ठरत आहे.
गणपती बाप्पांचं हे रूप पाहून भक्तही थबकले! ‘कोल्हापूरचा गोविंदा’ची अनोखी संकल्पना चर्चेत
|