बातम्या
कागलच्या श्रीराम मंदिरात स्वामी समर्थांच्या पादुकांचा भक्तिमय दर्शन सोहळा
By nisha patil - 12/17/2025 5:45:55 PM
Share This News:
कागलच्या श्रीराम मंदिरात स्वामी समर्थांच्या पादुकांचा भक्तिमय दर्शन सोहळा
‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’ गजरात कागल शहर स्वामीमय
:कागल येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचा दर्शन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. “श्री स्वामी समर्थ महाराज की जय” या गजराने संपूर्ण शहर स्वामीमय झाले. अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे भोसले (तिसरे) यांच्या पुढाकाराने प्रथमच या पादुका कागलमध्ये दर्शनासाठी आणण्यात आल्या.
सकाळी मोटेच्या विहिरीवरील बंगल्यात विधिवत अभिषेकानंतर पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर भाविकांनी औक्षण व पुष्पवृष्टी केली. दिवसभर श्रीराम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
कागलच्या श्रीराम मंदिरात स्वामी समर्थांच्या पादुकांचा भक्तिमय दर्शन सोहळा
|