राजकीय
संसदेत खा. धनंजय महाडिक यांनी मांडले क्रीडा विधेयक
By nisha patil - 8/21/2025 1:29:06 PM
Share This News:
संसदेत खा. धनंजय महाडिक यांनी मांडले क्रीडा विधेयक
राष्ट्रीय क्रीडा मंडळामुळे खेळाडूंना न्याय – महाडिक
नवी दिल्ली-: नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक सुधारणा विधेयक यावर भूमिका मांडली. राष्ट्रीय क्रीडा मंडळाची स्थापना झाल्यानं खेळाडूंना न्याय मिळेल आणि महासंघातील गैरकारभारावर नियंत्रण येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाडिक म्हणाले की, पूर्वी महासंघांतील वाद, गटबाजीमुळे खेळाडूंचं नुकसान व्हायचं. पण आता मंडळाला उच्च न्यायालयाच्या समकक्ष अधिकार असणार असून, महासंघातील वाद मिटवण्याची जबाबदारी मंडळावर असेल. यामुळे खेळाडूंना योग्य पाठबळ मिळेल. असंही त्यांनी नमूद केलं
संसदेत खा. धनंजय महाडिक यांनी मांडले क्रीडा विधेयक
|