बातम्या
मराठवाड्यातील दीड हजार पुरग्रस्त कुटुंबांना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत
By nisha patil - 9/29/2025 8:25:02 PM
Share This News:
मराठवाड्यातील दीड हजार पुरग्रस्त कुटुंबांना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत
कोल्हापूर, दि. २९ सप्टेंबर – खासदार धनंजय महाडिक आणि भाजपच्या वतीने मराठवाड्यातील पुरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली जाणार आहे. हेरले (ता. हातकणंगले) येथील श्री बिस्कीटच्या गोदामात १५०० कीट तयार करण्यात आली असून मंगळवारी (३० सप्टेंबर) सकाळी साडेअकरा वाजता ट्रकद्वारे मदत रवाना होईल.
या कीटमध्ये तांदूळ, गहू पीठ, साखर, चहा पावडर, तेल, मीठ, डाळी, कांदा-बटाटा, टूथपेस्ट, ब्रश, साबण, कपड्याचा साबण, ब्लँकेट, टॉवेल अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. खासदार महाडिक यांनी आज हेरले येथे जाऊन कीट तयार करण्याच्या कामाची पाहणी केली व प्रत्येक वस्तूचा दर्जा तपासला.
मराठवाडा व सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी महाडिक परिवार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी भाजप कार्यकर्त्यांनी मदत रवाना होण्यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.
यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार महाडिक यांचा सत्कार केला. इंद्रजित जाधव, सचिन तेरदाळे, मकरंद बोराडे, राहुल कुंभार, पद्मश्री तेरदाळे, बिपिन अलमान, प्रशांत माळी, अविनाश पाटील, स्वप्निल चौगुले, सुनील खारेपाटणे, प्रमोद महाडिक, विनोद कुरणे, अभिषेक मोहिते, डॉ. सतीश तेरदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातील दीड हजार पुरग्रस्त कुटुंबांना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत
|