शैक्षणिक
बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवीत दर्डेवाडीची धनश्री केरकर प्रथम
By nisha patil - 4/5/2026 4:40:09 PM
Share This News:
बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवीत दर्डेवाडीची धनश्री केरकर प्रथम
आजरा महाविद्यालयात प्रथम तर केंद्रात दुसरी
आजरा(हसन तकीलदार) : बारावीच्या बोर्ड परीक्षेत आजरा महाविद्यालयातील व्यावसायिक विभागाकडील बँकिंग अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी धनश्री दिगंबर केरकर हिने ८६ टक्के गुण मिळवीत आजरा महाविद्यालयात प्रथम तर आजरा केंद्रात दुसरी आली आहे. याच विभागाची सानिका सुतार ८५.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात दुसरी व केंद्रात तिसरी आली आहे.
विभागानुसार निकाल व गुणवंत विद्यार्थी असे
व्यावसायिक विभाग ( बँकिंग अभ्यासक्रम ) - १०० टक्के
प्रथम - धनश्री केरकर ८६ टक्के, द्वितीय - सानिका सुतार - ८५.५० टक्के, तृतीय - महेश्वरी दोरुगडे - ८१.१७ टक्के.
इलेक्ट्रिकल अभ्यासक्रम -( १०० टक्के ) प्रथम अनिकेत कांबळे - ७१.३३ टक्के, द्वितीय - विघ्नेश मराठे - ७१ टक्के, तृतीय - प्रणव कांबळे.
विज्ञान शाखा - ( ९८.२३ टक्के ) प्रथम - राखी नवार - ८३.५० टक्के, द्वितीय - भक्ती परुळेकर - ८२.६७ टक्के, तृतीय - आदिती गावडे - ८०.६७ टक्के.
वाणिज्य शाखा - ( ७५.२० टक्के ) प्रथम - विपुल इंगळे - ८०.८३ टक्के, द्वितीय - साक्षी रेडेकर - ७८.५० टक्के, तृतीय - सुशील बोलके - ७८.३३.
कला शाखा - ( ८०.८५ टक्के )
प्रथम - वंदना कस्तुरे - ७०.६७ टक्के, द्वितीय - सिद्धीका शिखलगार - ६६.१७, तृतीय - माधुरी कांबळे - ६४.८३ टक्के.
बारावीच्या बोर्ड परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवीत दर्डेवाडीची धनश्री केरकर प्रथम
|