बातम्या
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग उभारणार — खासदार धनंजय महाडिक
By nisha patil - 12/11/2025 12:38:09 PM
Share This News:
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग उभारणार — खासदार धनंजय महाडिक
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग आणि हॉल उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. शिवाजी विद्यापीठात सांसद खेल महोत्सवांतर्गत झालेल्या जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १४० खेळाडूंनी सहभाग घेतला. राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी सांगितले की, उदयोन्मुख बॉक्सरांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आणि प्रशिक्षकांची मदत मिळावी, यासाठी स्वतः पुढाकार घेणार आहेत.
कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग उभारणार — खासदार धनंजय महाडिक
|