बातम्या

खासदार धनंजय महाडिक यांची जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड

Dhannjay mahdik 1


By nisha patil - 2/6/2026 10:58:25 PM
Share This News:



खासदार धनंजय महाडिक यांची जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड

कोल्हापूर: केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोल्हापूर जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी खासदार धनंजय महाडिक यांची निवड करण्यात आली आहे. तर खासदार धैर्यशील माने आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सुधारीत वितरण क्षेत्र योजना (RDSS), पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना तसेच अन्य विद्युतविषयक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, जिल्ह्यातील आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षा तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र शासनाच्या सर्व विद्युत योजनांचा लाभ शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्यात येतील. तसेच योजनांच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही दिली.

महाडिक यांच्या निवडीमुळे केंद्र शासनाच्या विविध विद्युत योजना महावितरणच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


खासदार धनंजय महाडिक यांची जिल्हा विद्युत समितीच्या अध्यक्षपदी निवड
Total Views: 3