बातम्या

धनराज कुंभार ठरला इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५

Dhanraj Kumbhar becomes Ichalkaranji Festival Shri 2025


By nisha patil - 4/9/2025 3:15:43 PM
Share This News:



धनराज कुंभार ठरला इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५

 सोहम साठेचा बेस्ट पोझिंग तर अनिरुद्ध नाईक मोस्ट मस्क्युलर

इचलकरंजी फेस्टिव्हलतर्फे आयोजित भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा घोरपडे नाट्यगृहात उत्साहात पार पडली. माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे व संयोजिका सौ. मोश्मी आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत शहरातील अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला.

स्पर्धेत धनराज कुंभार याने इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५ किताब पटकावला. तर सोहम साठे याने बेस्ट पोझिंग आणि अनिरुद्ध नाईक याने मोस्ट मस्क्युलर अँड इम्प्रुव्हड किताब जिंकला.

चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला शहरातील तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने गणेशोत्सवात उत्साहाची भर पडली.


धनराज कुंभार ठरला इचलकरंजी फेस्टिव्हल श्री २०२५
Total Views: 59