बातम्या
Dhanvantari idol installation ceremony ...एस.पी. पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये धन्वंतरी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न
By nisha patil - 5/7/2025 8:19:50 PM
Share This News:
एस.पी. पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये धन्वंतरी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न
मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांची प्रमुख उपस्थिती
कोरोची, ता. ५ जुलै : श्री. भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या श्री. एस. पी. पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज (कॅम्पस 2) येथे श्री धन्वंतरी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या श्रद्धाभावाने पार पडला. या सोहळ्याला आमदार डॉ. सुजित मिणचेकर (संचालक, गोकुळ दूध संघ) यांनी उपस्थिती लावून शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. मिणचेकर म्हणाले, “मनुष्याने सतत आनंदी राहावे, हे आरोग्याचे खरे संकेत आहेत. आरोग्य शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना वैद्यकीय ज्ञान मिळावे यासाठी डॉ. प्रदीप पाटील आणि संस्थेने केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आरोग्यसेवेचे कार्य करावे, हेच खरे वैद्यक धर्म आहे.”
कार्यक्रमास डॉ. विजया पाटील, डॉ. रणजीत पाटील, संस्थेचे संस्थापक डॉ. प्रदीप पाटील, अध्यक्षा डॉ. शुभांगी पाटील, संचालक अमोल पाटील, ऋषिकेश पाटील, मुकुंद मोकाशी, प्राचार्य डॉ. एच.आर. अनिकेत कांबळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर, शिक्षक, पत्रकार विनोद शिंगे व मान्यवर उपस्थित होते.
Dhanvantari idol installation ceremony ...एस.पी. पाटील आयुर्वेदिक कॉलेजमध्ये धन्वंतरी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न
|