बातम्या
धारावी मॉडेल कोल्हापुरात? महापौर रूपाराणी निकम यांचा मोठा संकल्प!
By nisha patil - 11/27/2026 3:11:34 PM
Share This News:
धारावी मॉडेल कोल्हापुरात? महापौर रूपाराणी निकम यांचा मोठा संकल्प!
कोल्हापूर शहरातील महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने त्यांनी मुंबईतील धारावी परिसरातील एका आधुनिक सुविधा केंद्राला भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची माहिती घेतली. हिंदुस्तान युनिलिव्हर, HSBC आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी येथे हे सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून महिलांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी, आर्थिक स्वावलंबन आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
या भेटीदरम्यान महापौर रूपाराणी निकम यांनी केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी करत महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती जाणून घेतली. मुंबईतील या यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर कोल्हापूर शहरातही असेच नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे, खासगी कंपन्यांच्या CSR अर्थात कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून कोल्हापुरात महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, रोजगारनिर्मिती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात नवे प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक सुविधा आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
धारावी मॉडेल कोल्हापुरात? महापौर रूपाराणी निकम यांचा मोठा संकल्प!
|