बातम्या
हलगीच्या निनादाने तरी अधिकारी जागे होणार काय?*
By nisha patil - 1/7/2026 3:46:37 PM
Share This News:
**हलगीच्या निनादाने तरी अधिकारी जागे होणार काय?*
**धरणे आंदोलन व हलगीनाद आंदोलनाचा दुसरा दिवस*
**आजरा(हसन तकीलदार)*:-पुनर्वसनासाठी मिळालेल्या जमिनीवरील बेकायदेशीर बोजा कमी करण्यासाठी कॉ. शिवाजी गुरव आणि त्यांचे सहकारी गडहिंग्लज तहसीलकार्यालयासमोर मागील दोन दिवसापासून बेमुदत धरणे व हलगीनाद आंदोलन करीत आहेत. अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी भर पावसात हलगीनाद सुरु आहे.तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी अजून दखल घेतली नाही असे कॉ. गुरव यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले.
आंबेओहळ धरणग्रस्ताना कडगाव ता. गडहिंग्लज येथील जमिनी मिळालेल्या आहेत. परंतु त्या जमिनीच्या सातबारा पत्रकी इतर हक्कात बोजा चढवण्यात आला असून तो चुकीच्या पद्धतीने चढवण्यात आला असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे आणि हे बोजानोंदी कमी करण्यासाठी त्यांनी मागील एक वर्षांपासून पाठपुरावा करीत असल्याचे सांगितले. तरीसुद्धा अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत म्हणून शेवटी संविधानिक पद्धतीने लढा देत गडहिंग्लज तहसील कार्यालयासमोर कॉ. शिवाजी गुरव आणि त्यांचे सहकारी धरणे व हलगीनाद आंदोलन सुरु केले आहे. जोरदार पावसात सलग दोन दिवस आंदोलन सुरु असून अधिकाऱ्यांनी मात्र अजून कोणतीही दखल घेतली नसाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु पोलीस निरीक्षक यांनी मात्र विषय समजून घेण्यासाठी संवाद साधला असल्याचे सांगितले. सलग दोन दिवस आंदोलन सुरु आहे. न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यांना योग्य न्याय मिळणार का? याकडे लक्ष आहे.पूर पाहणी दौऱ्यासाठी जिल्हाधिकारी गडहिंग्लज दौऱ्यावर आहेत. त्यांची भेट घेऊन आपली व्यथा जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार असल्याचे कॉ. गुरव यांनी सांगितले.
हलगीच्या निनादाने तरी अधिकारी जागे होणार काय?*
|