राजकीय
शिरढोणमध्ये रविवारी संवाद साहित्य संमेलन
By nisha patil - 12/22/2025 11:02:28 AM
Share This News:
शिरढोण (संजय गायकवाड):- साहित्य परिषद बहुद्देशिय संस्था शिरढोण आयोजित १२वे संवाद ग्रामीण साहित्य संमेलन स्व.शामराव पाटील (यड्रावकर) साहित्य नगरी जैन सांस्कृतिक भवन कन्या शाळेजवळ शिरढोण (ता.शिरोळ) येथे रविवार दिनांक२८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ५ यावेळेत आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वास बालीघाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप पाटील हे असणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन आमदार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणारं आहे.स्वागताध्यक्ष म्हणून शिरढोणचे सरपंच सागर भंडारे तर ग्रंथ दिंडीचे उद्घाटन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉ.राहुल आवाडे यांच्या हस्ते तर दीपप्रज्वलन माधवराव घाटगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण व अध्यक्षीय बीजभाषण ,पुरस्कार प्राप्त मान्यवर माजी सैनिक विकास शिंगे याना शिरढोण भूषण, वजीर रेस्क्यू फोर्स (औरवाड) यांना सामाजिक कार्य, डॉ.सुनील पाटील यांना समाजसेवा तसेच कवी भारत सातपुते (लातूर) यांच्या " जागरण" या कविता संग्रहास, मनोहर भोसले यांच्या "हराकी"या कादंबरीस आणि रंगराव बन्ने यांच्या "अखेर बांध फुटला" या कथासंग्रहास स्व.पारिसा बालिघाटे स्मुर्ती साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
प्रा. शांतीनाथ मांगले व मारूती मांगोरे यांचे कथाकथन आणि प्रसिद्ध कवी वसंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रित कवी मनोहर भोसले, शिवाजी गायकवाड,विजय पवार, राजगोंडा पाटील, श्रीमती.माणिक नागावे, संजय सुतार, रंगराव बन्ने,कवी सरकार, महेश काळींगे यांचे कवी संमेलन होणारं आहे.या कार्यक्रमास पी.एम. पाटील, सागर आडगाणे, डॉ.रावसाहेब पाणदारे, राहुल खंजिरे, प्रदीप पाटील, आण्णासो चकोते, पोपट चौगुले, डॉ.श्रीकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.यावेळी दिलीप कोळी, कुमार पाटील, संजय मालगावे, विलास चौगुले,लता काकडे, कमल बीरोजे, जगन्नाथ बिरोजे, महावीर कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थीत होते.
शिरढोणमध्ये रविवारी संवाद साहित्य संमेलन
|