ताज्या बातम्या
मनपाडळे येथे महामंडळाच्या एसटीतून डिझेल चोरी
By nisha patil - 11/11/2025 11:53:21 AM
Share This News:
हातकणंगले(प्रतिनिधी किशोर जासूद):- तालुक्यातील मनपाडळे येथे महामंडळाच्या पेठवडगाव ते मनपाडळे एसटी मधून डिझेलची चोरी झाल्याने एसटी जाऊ शकलो नाही यामुळे एकच खळबळ उडाली. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली . संशयितास पेठवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गावच्या हनुमान मंदिर जवळ ग्रामपंचायत चौकात लावलेल्या गाड्यांचे पेट्रोल मागील काही दिवसापासून अनेक वेळा चोरीस जाण्याची घटना घडत होती. अचानक गाडीतील पेट्रोल संपल्याने नागरिक हैराण होत होते. रविवारी रात्री चोरट्याने चक्क गावात वस्तीसाठी येणाऱ्या वडगाव ते मनपाडळे या एसटी महामंडळाच्या एसटीतील डिझेल टाकीतून डिझेल काढत पूर्णपणे रिकामी केली व परस्पर विकण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी चालक सुरेश बुडे नेहमीप्रमाणे एसटी सुरू करण्याची प्रयत्न केला असता डिझेल संपल्याचे त्यांच्या लक्षात आले.
एसटी खाली सांडलेल्या डिझेलच्या खुणावरून त्यांनी पाहणी केली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संबंधित घडलेला प्रकाराची माहिती गावातील पोलीस पाटील व पेठवडगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी येथील एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
मनपाडळे येथे महामंडळाच्या एसटीतून डिझेल चोरी
|