बातम्या
इचलकरंजीत श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला मान्यवरांची उपस्थिती
By nisha patil - 6/9/2025 3:01:10 PM
Share This News:
इचलकरंजीत श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला मान्यवरांची उपस्थिती
इचलकरंजी : गणरायाचा अखंड जयघोष, झांजपथक अन् बेन्जोचा निनाद, ढोल-ताशांच्या कडकडाटावर ठेक्याने भरलेला उत्साह आणि भव्यदिव्य चित्ताकर्षक गणेशमूर्ती व आकर्षक आरास अशा भावपूर्ण वातावरणात दहा दिवस विराजमान असलेल्या श्री गणरायाला अखेरचा निरोप देण्यात आला.
परंपरेनुसार शहर वाहतूक नियंत्रण शाखा शिवतीर्थपासून मानाच्या श्री बिरदेव वाचनालय मंडळाच्या मानाच्या श्री पालखीचे माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली.
यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड, महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, प्रांताधिकारी दिपक शिंदे, माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर इचलकरंजी पोलिस दलाच्या श्रींचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी अप्पर तहसीलदार महेश खिलारे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, महेश चव्हाण, सचिन सुर्यवंशी, शहर वाहतूक शाखेचे सपोनि प्रशांत निशाणदार, मदन कारंडे, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, अनिल डाळ्या, प्रकाश मोरबाळे, राजू आलासे, महादेव गौड, सदा मलाबादे, अश्विनी कुबडगे, शशिकला बोरा, सुवर्णा शहा, ध्रुवती दळवाई यांच्यासह मान्यवर उपस्थित राहून विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले.
इचलकरंजीत श्रींच्या विसर्जन मिरवणुकीला मान्यवरांची उपस्थिती
|