राजकीय
स्व. दिनकरराव जाधवांच्या स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांची तिरवडेमध्ये उपस्थित
By nisha patil - 4/12/2025 1:30:23 PM
Share This News:
4 डिसेंबर 2025:- काँग्रेसचे जेष्ठ नेते, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आणि राधानगरी–भुदरगडचे माजी आमदार स्व. दिनकरराव जाधव यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तिरवडे येथे विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले.
या वेळी माजी आमदार के. पी. पाटील, तसेच ज्येष्ठ नेते संजयबाबा घाटगे यांची उपस्थिती विशेष ठरली.
स्व. दिनकरराव जाधव हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांबद्दलची तळमळ असलेले, त्यांच्या न्यायासाठी आयुष्यभर लढणारे लोकनेते म्हणून ओळखले जात. गावागावातील प्रश्न सोडविण्याची जिद्द, सहकार क्षेत्रातील योगदान आणि जनतेशी असलेली नाळ यामुळे ते सतत लोकांच्या मनात राहिले. त्यांच्या स्मृतीदिनी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या मूल्यांचा, लोकसेवेच्या परंपरेचा आणि सहकाराच्या वारशाचा गौरव करत तो पुढे नेण्याची प्रतिज्ञा व्यक्त केली.
कार्यक्रमाला राहुल बजरंग देसाई, कॉ. सम्राट मोरे, नाथाजी पाटील, शामराव देसाई, उमेश आपटे, प्रकाश पाटील, वसंतराव पाटील, मधुआप्पा देसाई, श्री चैतन्य महाराज, सत्यजीत दिनकरराव जाधव, विश्वजीत दिनकरराव जाधव, स्वरूपाराणी जाधव, सरपंच शुभांगीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच गोकुळ डेअरीचे, बिद्री सहकारी साखर कारखान्याचे आजी–माजी संचालक, राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून स्मृतिदिनाचे औचित्य साधले.
स्व. दिनकरराव जाधवांच्या स्मृतीदिनानिमित्त मान्यवरांची तिरवडेमध्ये उपस्थित
|