बातम्या

दिनेश कांबळे यांचा शेतकरी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार*

Dinesh Kamble felicitated for being


By nisha patil - 12/11/2025 4:16:48 PM
Share This News:



दिनेश कांबळे यांचा शेतकरी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार*
 

आजरा(हसन तकीलदार):-आजरा तालुक्यातील पेरणोली येथील दिनेश कांबळे हे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी लावलेले आहे. शिवसेना उबाठच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेणारे दिनेश कांबळे हे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची आजरा तालुका शेतकरी सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाली.
   

  पेरणोली गावात राहणारे दिनेश कांबळे हे पहिल्यापासूनच शिवसेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिरीरीने काम करणारे ते सच्चे शिवसैनिक आहेत. आजपर्यँत शिवसेनेने केलेल्या बहुतांशी आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. प्रत्येक आंदोलनात त्यांचा पुढाकार आणि घोषणा या ठरलेल्या बाबी असतात. त्याचीच पोहच पावती म्हणून त्यांना हे तालुका अध्यक्षपद मिळाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यनिमित्ताने ते म्हणाले की, यापुढेही शिवसेनेशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी आपण जीवनभर काम करणार आहे. मी ही शेतकरीच आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि त्यांच्या समस्यासाठी मी लढा देणार आहे.

क्षवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी माझे जीवन लावणार असलेबाबत त्यांनी यावेळी सांगितले. तालुका शेतकरी सेनेच्या अध्यक्ष पदी त्यांची निवड झालेबद्दल उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व तालुका प्रमुख युवराज पोवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप पाचवडेकर, अमित गुरव, भिकाजी विभुते, बिलाल लतीफ, हरिश्चंद्र व्हराकटे, सुभाष कांबळे आदि शिवसैनिक उपस्थित होते.


दिनेश कांबळे यांचा शेतकरी सेनेच्या तालुका अध्यक्षपदी निवड झालेबद्दल सत्कार*
Total Views: 569