शैक्षणिक

दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके - डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 

Diploma Engineering is a good career option after 10th  Dr Mahadev Narke


By nisha patil - 5/19/2026 4:25:33 PM
Share This News:



दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके - डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 

 

विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना संबंधित क्षेत्राची आवड आणि आपली क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा. दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.

 

डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक तर्फे  मंगळवारी दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली. यामध्ये प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी दहावीनंतरच्या करीअर संधी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. डी. वाय. पाटील पॉलीटेक्निक मध्ये २० मे पासून प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरु होत असून याचा विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. नरके यांनी यावेळी केले.  

 

डॉ. नरके म्हणाले,  दहावीनंतर नेमकं कोणत्या क्षेत्रात जायचं? याबद्दल विद्यार्थ्यांबरोबरच पालकांच्याही मनात अनेक प्रश्न असतात.  सध्या कोणत्या शाखेला स्कोप आहे ? हा प्रश्नही वारंवार विचारला जातो. मात्र पालकांनी आपल्या अपेक्षा पाल्यावर न लादता त्यांना त्यांना जास्तीत जास्त क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांचा करीअर मार्ग सोपा करावा.

 

डॉ. नरके यांनी, दहावीनंतरच्या करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, करिअर क्षेत्र कसं निवडावं, , ए आय आणि कॉम्प्युटर इंजिनीअरिंग यामधील फरक, डिप्लोमाचे फायदे, डिप्लोमानंतर डिग्रीसाठी ॲडमिशन प्रक्रिया, डिप्लोमानंतर नोकरीच्या संधी, नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्री स्पॉसर डिग्री शिक्षण याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.  
डी. वाय पॉलिटेक्निकला एम.एस.बी.टी.ई. मुंबई कडून विभागांना सात्यत्याने ‘व्हेरी गुड’ मानांकन प्राप्त झाले आहे. शासकीय नियमानुसार मुलींना मोफत शिक्षण, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत उपलब्ध असल्याचे त्यानी सांगितले.

 

उपप्राचार्य  प्रा. नितीन  माळी यांनी, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे,  प्रवेश फेऱ्या, ऑप्शन कसे भरावे याबद्दल मार्गदर्शन केले.  या सेमिनारला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी रजिस्ट्रार महेश रेणके यांच्यासह  विद्यार्थी व पालक उपस्थित होते.प्रा. वैष्णवी पाटील  यांनी सूत्रसंचालन केले.


दहावीनंतर डिप्लोमा इंजीनियरिंग हा करिअरचा उत्तम पर्याय - डॉ. महादेव नरके - डी. वाय. पाटील पॉलीटेक्निकमध्ये प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन 
Total Views: 16