बातम्या
बुलढाण्यातील शेतकऱ्यांना अन्न ऐवजी थेट रोख रक्कम – सरकारचा आत्महत्यारोधी उपक्रम
By Administrator - 8/9/2025 4:18:45 PM
Share This News:
बुलढाण्यातील शेतकऱ्यांना अन्न ऐवजी थेट रोख रक्कम – सरकारचा आत्महत्यारोधी उपक्रम
बुलढाणा आणि इतर 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत न आलेल्या केशरी रेशनकार्ड धारक शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम मिळणार आहे. जानेवारी 2023 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत २,१८,५८२ शेतकऱ्यांना ३ कोटी ७१ लाखांहून अधिक रक्कम हस्तांतरित केली जाणार आहे.
नगदी मदतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळत आहे; त्यांचा पैसा आरोग्य, शिक्षण, शेती साधने, बियाणे किंवा कर्जफेडीसाठी वापरता येणार आहे. यामुळे स्थानिक बाजारपेठेला गती मिळेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची आशा आहे.
बुलढाण्यातील शेतकऱ्यांना अन्न ऐवजी थेट रोख रक्कम – सरकारचा आत्महत्यारोधी उपक्रम
|