बातम्या
🚨 बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास थेट जेल!
By nisha patil - 4/10/2025 1:49:44 PM
Share This News:
कोल्हापूर :- जिल्हा परिषदेत दिव्यांग कोट्यातून कार्यरत अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. अपात्र व्यक्ती लाभ घेतल्याचे आढळल्यास त्यांना दोन वर्षांची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड, तसेच दोन्ही शिक्षाही एकत्र होण्याची शक्यता आहे.
अलीकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्रांच्या वैधतेसंबंधी अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. काही व्यक्तींनी अल्प दिव्यांगत्व असूनही ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असल्याचे खोटे दाखवून नोकरी मिळवली, अशी तक्रारींवरून राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदांना पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत.
४० टक्क्यांपेक्षा कमी दिव्यांगत्व आढळल्यास त्यांचे सर्व लाभ रद्द होणार आहेत. बनावट कागदपत्रांचा आधार घेत नोकरी मिळवलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम २१ अंतर्गत ही तपासणी सुरू झाली असून, दोषींना नोकरी गमावणे, दोन वर्षांची शिक्षा आणि दंड होईल.
🚨 बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास थेट जेल!
|