बातम्या

भटके-विमुक्त समाजासाठी आरोग्यजागृतीची दिशा

Direction of health awareness for a nomadicfree society


By nisha patil - 9/13/2025 3:27:51 PM
Share This News:



भटके-विमुक्त समाजासाठी आरोग्यजागृतीची दिशा

महात्मा फुले योजनेचा लाभ घ्यावा – संतोष कुलकर्णी

 कोल्हापूर शहरातील वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल येथे भटके-विमुक्त विकास परिषद आणि महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयक बैठक संपन्न झाली.

बैठकीत भटके-विमुक्त समाजातील वस्तीप्रमुखांनी सहभाग घेतला. या समाजातील आरोग्य समस्यांवर चर्चा करून उपाययोजना आखण्यात आल्या. महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे श्री. संतोष कुलकर्णी यांनी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सविस्तर माहिती दिली. गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी या योजना कशा उपयुक्त आहेत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कुलकर्णी म्हणाले की, १९८७ साली सुरू झालेले वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटल हे कोल्हापूरमधील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून, सामान्य नागरिकांना कमी खर्चात विश्वासार्ह सेवा पुरवित आहे. अद्यापही अनेक भटके-विमुक्त घटक आरोग्यसेवेपासून वंचित असून, त्यांच्यासाठी शासकीय योजना, स्थानिक संस्था आणि आरोग्यदूत यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.

महिला व बालआरोग्य, लसीकरण, कुपोषण, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारांवर विशेष भर देण्यात येणार आहे. महिला आरोग्य शिबिरे, तपासणी मोहिमा आणि मोफत औषधवाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा संकल्प या बैठकीत झाला.


भटके-विमुक्त समाजासाठी आरोग्यजागृतीची दिशा
Total Views: 59