बातम्या
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी आपत्ती व्यवस्थापनची हेल्पलाइन सुरू – संपर्क साधण्याचे आवाहन
By nisha patil - 4/23/2025 3:27:03 PM
Share This News:
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी आपत्ती व्यवस्थापनची हेल्पलाइन सुरू – संपर्क साधण्याचे आवाहन
पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने 24x7 हेल्पलाइन सुरू केली आहे. मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज श्रीनगरहून मुंबई येथे विमानाने आणण्यात येणार असून, तेथून ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पोहोचवले जाणार आहेत.
काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांनी खालील श्रीनगर जिल्हा प्रशासनाच्या मदत क्रमांकांवर देखील संपर्क साधावा:
📞 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543
📱 व्हॉट्सअॅप: 7006058623, 7780805144, 7780938397
राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात असून, नागरिकांनी घाबरून न जाता वरील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी आपत्ती व्यवस्थापनची हेल्पलाइन सुरू – संपर्क साधण्याचे आवाहन
|