बातम्या
पिक पाहणीच्या नोंदीवरून वाद; कोतवालाच्या डोक्यात हेल्मेटने मारहाण
By nisha patil - 9/24/2026 3:38:58 PM
Share This News:
पिक पाहणीच्या नोंदीवरून वाद; कोतवालाच्या डोक्यात हेल्मेटने मारहाण
प्रतिनिधी शहानवाज मुजावर - पिक पाहणीची नोंद करण्याच्या कारणावरून कोतोली (ता. पन्हाळा) येथे कोतवालावर हेल्मेटने हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. कोतवाल कृष्णात गाबुराव पाटील (वय ३८) हे तहसीलदारांच्या आदेशानुसार गेल्या महिन्यापासून डिजिटल क्रॉप सर्व्हेचे काम करत आहेत. बुधवारी तलाठी विद्या देशमुख यांच्यासोबत कार्यालयीन कामकाज सुरू असताना पिक पाहणीच्या नोंदीवरून वाद झाला.
कोतोली येथील शेतातील ओढ्याची नोंद पिक पाहणीत करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, डिजिटल सॉफ्टवेअरमध्ये ‘ओढा’ असा पर्याय उपलब्ध नसून केवळ विहीर आणि बोअरवेलचे पर्याय असल्याचे तलाठी व कोतवाल यांनी सांगितले. तसेच नोंदणीसाठी रोहित पानकर यांची नेमणूक झाल्याने त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले.
यावरून धोंडीराम पाटील यांनी कोतवाल कृष्णात पाटील यांची कॉलर पकडून शिवीगाळ केल्याचा, तसेच हातातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप आहे. या मारहाणीत कोतवाल जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घटनेनंतर कृष्णात पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार संबंधितांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पिक पाहणीच्या नोंदीवरून वाद; कोतवालाच्या डोक्यात हेल्मेटने मारहाण
|