बातम्या

गहाण दागिन्यांचा वाद: पोलिस ठाण्यातच महिलांची हातघाई, पद्मजा इंगवले यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल

Dispute over mortgaged jewellery


By nisha patil - 4/17/2025 4:31:47 PM
Share This News:



गहाण दागिन्यांचा वाद: पोलिस ठाण्यातच महिलांची हातघाई, पद्मजा इंगवले यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल

कोल्हापूर – गहाण ठेवलेल्या दागिन्यांची रक्कम व्याजासह परतफेड करूनही दागिने न परत केल्याच्या वादातून गावभाग पोलिस ठाण्यातच दोन महिला गटांमध्ये जोरदार झटापट झाली. पद्मजा इंगवले (रा. मंगळवार पेठ) या महिलेला मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी इंगवले यांच्या विरोधात मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदर्शन ऊर्फ गंगा कांबळे (रा. टाकवडे वेस) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यांनी ओळखीतून इंगवले यांच्याकडे चार तोळे दागिने गहाण ठेवून ८७ हजार रुपये घेतले होते. ही रक्कम व्याजासह परतफेड करूनही इंगवले यांनी दागिने परत करण्यास टाळाटाळ केली. उलट ५ टक्के अधिक व्याज दिल्याशिवाय दागिने देणार नाही, असा हट्ट धरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

ही बाब पोलिस ठाण्यात गेल्यानंतर गंगा कांबळे या सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी कुबडगे, सावित्री हजारे यांच्यासह महिलांसोबत पोलिस ठाण्यात पोहोचल्या. तिथेच इंगवले यांच्याशी वाद उफाळून झटापटीपर्यंत गेला. कांबळे यांच्या म्हणण्यानुसार, इंगवले यांनी त्यांना तसेच अश्विनी कुबडगे व यास्मिन सनदी यांनाही मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिली.

याप्रकरणी कांबळे यांनी गावभाग पोलिसांकडे खासगी सावकारी, जातिवाचक शिवीगाळ व दागिने हडप केल्याच्या आरोपासह कडक कारवाई करण्याची मागणी पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


गहाण दागिन्यांचा वाद: पोलिस ठाण्यातच महिलांची हातघाई, पद्मजा इंगवले यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल
Total Views: 133