बातम्या

‘निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्ती’चे शिवाजी विद्यापीठात वितरण

Distribution of Retired Teachers Scholarship at Shivaji University


By nisha patil - 11/9/2025 3:21:14 PM
Share This News:



‘निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्ती’चे शिवाजी विद्यापीठात वितरण

कोल्हापूर, ११ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागात गेल्या मंगळवारी (दि. ९) ‘निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्ती’चे पात्र विद्यार्थ्यांना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
 

अधिविभागातर्फे ‘निवृत्त शिक्षकाची शिष्यवृत्ती’ आणि निवृत्त प्राध्यापक डॉ. सी.एच. भोसले यांच्या आईंच्या स्मृतीप्रित्यर्थ असणारे पारितोषिक तसेच ‘विद्यावर्धिनी पारितोषिक’ अशा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतात. यंदा अधिविभागातील विद्यार्थिनी लक्ष्मी कृष्णराज भिर्डे आणि कोमल शांताराम घुटुकडे यांना निवृत्त शिक्षकाची शिष्यवृत्ती, डॉ. भोसले यांच्या आईंचे स्मृती पारितोषिक सुबहान मिरासाहेब जमादार यांना आणि प्रियांका रामदास पाटील यांना विद्यावर्धिनी पारितोषिक प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी अधिविभागाच्या वतीने प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांचाही त्यांच्या उत्कृष्ट शैक्षणिक, संशोधकीय आणि प्रशासकीय योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
 

यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. राजीव व्हटकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. केशव राजपुरे यांनी मनोगते व्यक्त केली. डॉ. नीलेश तरवाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला भौतिकशास्त्र अधिविभागातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. एम. आर. वाईकर यांनी आभार मानले.


‘निवृत्त शिक्षकाच्या शिष्यवृत्ती’चे शिवाजी विद्यापीठात वितरण
Total Views: 52