बातम्या
ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
By nisha patil - 4/22/2025 8:38:44 PM
Share This News:
ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
अनुकंपा तत्त्वावर 31 उमेदवारांना शासकीय नोकरी
सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार 31 डिसेंबर 2024 अखेर प्रतीक्षासूचीत असलेल्या 31 उमेदवारांना गट-क व गट-डच्या रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्ती देण्यात आली. नियुक्तीपत्र वाटप समारंभ ना. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
या वेळी बोलताना त्यांनी उमेदवारांना प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. "दुर्देवी प्रसंगानंतर मिळालेली ही संधी समाजासाठी उपयोगात आणा," असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. , अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
|