बातम्या
उंचगावमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
By nisha patil - 7/30/2025 3:34:22 PM
Share This News:
उंचगावमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
"समाजकारण हेच आमचे बाळासाहेबांचे वचन" – राजू यादव
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यम फाउंडेशनच्या वतीने उंचगाव येथील कुमार व कन्या विद्या मंदिर शाळेमधील गरजू १७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास पेटी, पेन यासह आवश्यक साहित्य देण्यात आले.या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले ८०% समाजकारण आणि २०% राजकारण हेच आमचे कार्यधर्म आहे.”सत्यम फाउंडेशनचे प्रतीक शिंदे यांनी सांगितले की, “फाउंडेशनच्या वतीने यापुढेही गरजूंना मदत करण्याचा आमचा प्रयत्न सुरूच राहील.”या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दीपक रेडेकर यांनी केले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना, युवासेना व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उंचगावमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
|