बातम्या

बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचे वाटप

Distribution of essential items to construction workers


By nisha patil - 6/6/2025 3:34:55 PM
Share This News:



बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचे वाटप

आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते वितरण सोहळा इचलकरंजीत उत्साहात संपन्न

इचलकरंजी, दि. ६ जून :महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांच्या वतीने, तसेच आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून जिवित नोंदणी असलेल्या बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच, पूरवठा सुरक्षा संच व अत्यावश्यक संच यांचे वितरण करण्यात आले.

हा वितरण समारंभ इचलकरंजी येथील घोरपडे नाट्यगृहात आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमात नवक्रांती बांधकाम कामगार युनियनचे अध्यक्ष मा. बंडोपंत सातपुते, तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष  प्रमोद पवार यांच्यासह मदन मुरगुंडे,  महावीर जैन,  श्रीशेल कित्तुरे,  अनिल कांबळे,  रमेश पाटील, शंकर नंदरगी,  हर्षद सातपुते, सत्यजित निंबाळकर,  मनीषा नाईक,  संगीता सिंग, उर्मिला सरवदे, स्वाती जाधव,  सादिक खलिफा, अनिल जाधव,  सचिन बिरंजे,  ऐश्वर्या हजारेआदम मुल्ला यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमात बोलताना आमदार डॉ. राहुल आवाडे म्हणाले की, "बांधकाम कामगार हा समाजाचा मजबूत पाया आहे. त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा व्हावी, त्यांच्या कुटुंबांची मूलभूत गरज पूर्ण व्हावी यासाठी शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे."

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयोजन केले. कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान व कृतज्ञतेचे भाव दिसून आले.


बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंचे वाटप
Total Views: 160