विशेष बातम्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नछत्र, पाणी व पुस्तके वाटप

Distribution of food


By nisha patil - 8/12/2025 3:16:14 PM
Share This News:



महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नछत्र, पाणी व पुस्तके वाटप
 

आजरा(हसन तकीलदार):-भारतरत्न, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन हा देशभरात "महापरिनिर्वाण"दिन म्हणून ओळखला जातो. या स्मृतिदिनानिमित्त देश विदेशातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमी येथे जमतात. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीसाठी "महपरिनिर्वाण" हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरला जातो. 7 डिसेंबर 1956 रोजी शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी असलेल्या जागेवर 12 लाख अनुयायांच्या उपस्थितीत त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. कालांतराने याच ठिकाणी आंबेडकरांच्या अस्थी कलशावर चैत्य उभारण्यात आले. ज्याला आज "चैत्यभूमी" म्हणून ओळखले जाते.
     

या दिवशी आलेल्या अनुयायांना सेवा सुविधा पुरवण्याचे काम अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीने केले जाते. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा रक्षाकाकडून अन्नछत्र, बिसलरी पाण्याचे तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी नेसरी गावचे नितीन राणबा कांबळे, येमेकोंड ता. आजरा येथील काशिनाथ कांबळे तसेच बृहन्मुंबईचे सुरक्षा रक्षक कर्मचारी, महिला कर्मचारी आदिजण उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.


महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नछत्र, पाणी व पुस्तके वाटप
Total Views: 20