ताज्या बातम्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नछत्र, पाणी व पुस्तके वाटप
By nisha patil - 8/12/2025 1:26:50 PM
Share This News:
आजरा (हसन तकीलदार):
भारतरत्न, संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देशभरात ‘महापरिनिर्वाण दिन’ मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने देश-विदेशातून लाखो अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झाले. बौद्ध परंपरेनुसार ‘महापरिनिर्वाण’ हा शब्द त्यांच्या पुण्यतिथीसाठी वापरला जातो. ७ डिसेंबर १९५६ रोजी शिवाजी पार्क येथील समुद्रकिनारी १२ लाख अनुयायांच्या उपस्थितीत डॉ. आंबेडकरांचा बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. पुढे याच स्थळी उभारलेल्या चैत्यास आज ‘चैत्यभूमी’ म्हणून ओळखले जाते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या भक्तांची सेवा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था व शासकीय यंत्रणा पुढे सरसावतात. याअन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षक विभागातर्फे अन्नछत्र, बिसलरी पाण्याचे वाटप तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित पुस्तके वाटप करण्यात आली.
या उपक्रमात नेसरी गावचे नितीन राणबा कांबळे, येमेकोंड (ता. आजरा) येथील काशिनाथ कांबळे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, महिला कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहून त्यांनी सर्व अनुयायांना अभिवादन केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अन्नछत्र, पाणी व पुस्तके वाटप
|