विशेष बातम्या

हातकणंगले येथे ११०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

Distribution of household items to 1100 registered construction workers in Hatkanangale


By nisha patil - 4/28/2025 12:00:38 AM
Share This News:



हातकणंगले येथे ११०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप

अतिग्रे (ता. हातकणंगले) : साई मंगल कार्यालय, अतिग्रे येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत हातकणंगले विभागातील ११०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तू संच वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या विशेष प्रयत्नातून करण्यात आले होते.

या कार्यक्रमात आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते कामगारांना वस्तूंचे संच वाटप करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राज शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू रोहित बांगवडे, युवा नेते शोएब शेख, जैद मुजावर, स्वीय सहायक सुहास राजमाने, बांधकाम कामगार प्रतिनिधी किरण माने, सुभाष लोखंडे, संतोष माळी, नितेश दिक्षांत, अभिजीत आवळे, संतोष खरात, भैय्यासाहेब धनवडे, महेश कोळी, विजय हेगडे यांच्यासह बांधकाम कामगार आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भविष्यातही कामगारांच्या हितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


हातकणंगले येथे ११०० नोंदणीकृत बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप
Total Views: 106