बातम्या
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सातबारा उताऱ्यांचे वाटप
By nisha patil - 10/10/2025 4:20:24 PM
Share This News:
मुरगुडच्या सावर्डेकर कॉलनीतील ५० मिळकत धारकांचा स्व-मालकीपत्राचा प्रश्न ४० वर्षानंतर निकालात
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सातबारा उताऱ्यांचे वाटप
कागल, दि. १०: मुरगुड येथील सावर्डेकर कॉलनीमधील ५० मिळकत धारकांच्या स्व- मालकी हक्कपत्राचा प्रश्न तब्बल ४० वर्षानंतर निकालात निघाला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यातून ही समस्या सुटली आहे. सर्व मिळकत धारकांना मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते स्व- हक्काच्या मालकीपत्राच्या सातबारा उताऱ्यांचे वाटप झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, १९८५ साली बिगरशेती झालेल्या या सर्व प्लॉटंना पोटखराब असा शेरा लागला होता. त्यामुळे नागरिकांना दोन फाळे भरावे लागायचे.
मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, येथील सावर्डेकर कॉलनीतील सर्वच म्हणजेच ५० नागरिकांच्या स्वमालकीच्या सातबारा उताऱ्यांचा हा प्रश्न होता. सातबारा पत्रकी पोटखराब असा शेरा लागल्यामुळे कर्ज काढणे, तारण देणे, खरेदी -विक्री करणे अशा सर्वच व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दोन बैठका होऊन हा प्रश्न कायमचा निकालात निघाला आहे.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, रणजीत सूर्यवंशी, राजू आमते, राजाराम चव्हाण, शिवाजी गोरुले, चंद्रकांत कुंभार, बाबुराव सिरसेकर, सयाजी राऊत, जगदीश सावर्डेकर, प्रा. महादेव बेनके, प्रा. रवींद्र गोसावी, सुरज गायकवाड, धोंडीराम भोई, दिलीप सावर्डेकर आदी प्रमुखांसह मिळकतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले. प्रस्ताविक राजू आमते यांनी केले. आभार रणजीत सूर्यवंशी यांनी मानले.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सातबारा उताऱ्यांचे वाटप
|