बातम्या
ए वाय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांना भांडी संच वाटप"
By nisha patil - 4/21/2025 3:40:38 PM
Share This News:
ए वाय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांना भांडी संच वाटप"
"सोळांकुर येथे श्रमिकांना सन्मान – सामाजिक भान जपत ए. वाय. पाटील यांचा उपक्रम"
केडीसीसी बँकेचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उत्तरदायित्व जपत बांधकाम कामगारांना भांडी संचाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. वाय. बापू होते. यावेळी सोळांकुरचे सरपंच. राजाराम कांबळे, सरपंच अरविंद निचिते, युवा नेते . संग्रामसिंह पाटील, तसेच ग्रामपंचायत सदस्य शिवानंद महाजन, विकास पाटील, रावसाहेब पानारी, भैय्या कुंभार यांची विशेष उपस्थिती होती.
ए वाय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कामगारांना भांडी संच वाटप"
|