बातम्या
जिल्हा बँक महिनाभरात साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका जाहीर करणार – हसन मुश्रीफ
By nisha patil - 4/19/2025 5:01:28 PM
Share This News:
जिल्हा बँक महिनाभरात साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका जाहीर करणार – हसन मुश्रीफ
साखर उद्योग सध्या आर्थिक अडचणीत सापडला असून, ऊसाच्या एफआरपीमध्ये वाढ झालेली असली तरी साखरेच्या दरवाढीची प्रतीक्षा सुरु आहे. यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिनाभरात जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी दिली. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या रथयात्रा नियोजन आढावा बैठकीत बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, यंदा साखर कारखाने केवळ तीन महिनेच चालले असून ही स्थिती बदलण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. कारखान्यांनी पुढाकार घेतल्यास जिल्हा बँक त्यांना सहकार्य करेल. ऊसाचे एकरी उत्पादन वाढवणे अत्यावश्यक असून, यासाठी सुरू असलेल्या योजनांबाबत अफवा पसरवणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका केली. राज्याच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम न होता विकासकामांना निधी कमी पडणार नाही, योजनाही सुरूच राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच लाडक्या बहिणीला 2100 रुपये वेळेवर दिले जातील, असेही ते म्हणाले.
जिल्हा बँक महिनाभरात साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका जाहीर करणार – हसन मुश्रीफ
|